Crime

अमळनेरात पहाटे एलसीबीचा धडक छापा; बेकायदेशीर गोवंश कत्तलीवर मोठी कारवाई

दोन ठिकाणी एकाचवेळी छापे; ११ जण ताब्यात, ६ फरार; ४.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पहाटे नियोजनबद्ध धडक कारवाई करत बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या दोन ठिकाणांवर छापे टाकून मोठी कारवाई केली. पारधीवाडा आणि जपान जिन परिसरात एकाचवेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ६ संशयित घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे व साहित्य जप्त करण्यात आले, तर तीन जिवंत बैलांची सुटका करून त्यांना सुरक्षित गोशाळेत हलविण्यात आले.

सकाळी ६ ते दुपारी १२ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी पारधीवाडा व जपान जिन परिसरातील दोन ठिकाणांवर एकाचवेळी धाड टाकली. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून हसनखान गुलाबखान पठाण (६५), मोहसीनखान हसनखान पठाण (३५), फराजखान हमीदखान कुरेशी (२०), अर्षदखान अजीजखान कुरेशी (४८), रियाज अहमद अब्दुल शकुर कुरेशी (५५), तन्वीर शेख ताहेर कुरेशी (४१), जावेदखान सुलेमानखान कुरेशी (५०), अब्दुल शेख नुरा कुरेशी (५०), अजीज शेख नजीर कुरेशी, अल्ताफखान अजीजखान कुरेशी (५६) आणि शरीफ शेख अकबर कुरेशी (२५) यांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, इकबाल शेख आहत शेख कुरेशी, जहांगीर शेख साबीर शेख कुरेशी, आरीफ अजीज कुरेशी, जाबीर खान अब्बासखान कुरेशी, जहीरखान जाबीरखान कुरेशी आणि शरीफ खान मजीदखान कुरेशी हे सहा संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

कारवाई दरम्यान विविध वयोगटातील गोवंशाचे सुमारे १,५७५ किलो मांस (अंदाजे किंमत ३ लाख १५ हजार रुपये) जप्त करण्यात आले. तसेच चार लोखंडी कुऱ्हाडी, नऊ लोखंडी सुऱ्या, सहा कोयते, दोन वजनकाटे व इतर साहित्य असा एकूण ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याशिवाय जपान जिन परिसरातील पत्र्याच्या शेडमधून १२ ते १६ वर्षे वयोगटातील तीन पांढऱ्या गावरान बैलांची सुटका करण्यात आली. या जनावरांची अंदाजित किंमत १ लाख ५५ हजार रुपये असून त्यांना सुरक्षित गोशाळेत हलविण्यात आले. जप्त मुद्देमाल व जनावरांची एकूण किंमत ४ लाख ७३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईनंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश वाठोरे यांच्या उपस्थितीत गोवंशाच्या मांसाचे रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) नमुने सीलबंद करण्यात आले. उर्वरित मांस अमळनेर नगर परिषदेच्या मदतीने पंचांसमक्ष खड्डा खोदून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button