बालमोहन विद्यालयात नशामुक्त महाअभियानातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश

बालमोहन विद्यालयात नशामुक्त महाअभियानातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश
चोपडा | प्रतिनिधी
अमर संस्था संचलित बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालयात नशामुक्त महाअभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष मनोज भाऊ चित्रकथी, सचिव दीपक जोशी, कॉलेज व्यवस्थापक विजय दीक्षित, ओम शांती सेंटर चोपडा येथील मंगला दीदी व सारिका दीदी, प्राचार्या प्रीती सर्वैया यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माँ शारदा देवीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्या प्रीती मॅडम यांनी ईशस्तवन सादर केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
व्यसनापासून दूर राहण्याचा विद्यार्थ्यांना संदेश
ओम शांती सेंटरच्या सारिका दीदी यांनी नशामुक्त महाअभियान सरकारने का सुरू केले आहे, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर व्यक्तीचे आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि संपूर्ण आयुष्य कशा प्रकारे उद्ध्वस्त होऊ शकते, हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
“देवाने आपल्याला अनमोल जीवन दिले आहे. त्यामुळे हे जीवन व्यसनांच्या आहारी न जाता चांगल्या आणि सकारात्मक पद्धतीने जगले पाहिजे,” असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा
मंगला दीदी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत प्रतिज्ञा म्हणत व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केला. यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध जनजागृतीपर घोषणाही करून घेण्यात आल्या.
कार्यक्रमात तुषार पाटील सर यांनी सुंदर गायन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या प्रीती सर्वैया यांनी केले.
यावेळी रुशमी मॅडम, राधिका मॅडम, सीमा मॅडम, वाघ सर, जितेंद्र पाटील सर, सूर्यवंशी, वीलेश चौधरी, प्रमोद भट, सुधीर भट, सुतार सर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







