Crime

प्रभात कुमार, प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती; चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रभात कुमार, प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती; चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई महापोलीस न्यूज l 10 मे 2025 मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांची नुकतीच मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्य सरकारने आणखी दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना महासंचालकपदी बढती दिली आहे. गृह विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.

1993 च्या तुकडीतील वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण विभागाचे संचालक प्रभात कुमार यांना महासंचालक दर्जा देऊन त्याच पदावर कायम ठेवण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे येथील अप्पर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांना महासंचालक पदावर उन्नती देऊन त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य लोहमार्ग पोलिस, मुंबई या विभागात करण्यात आली आहे.

बुरडे यांच्या बदलीमुळे सीआयडी पुणे येथे रिक्त झालेल्या अप्पर पोलिस महासंचालक पदावर नियोजन व समन्वय विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांची बदली राज्य राखीव पोलिस बलाच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी झाली असून, त्यांच्या जागी प्रशासन विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक के. एम. एम. प्रसन्ना यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तसेच, लोहमार्ग पोलिस, मुंबईचे अप्पर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे यांची बदली महामार्ग सुरक्षा विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक पदावर करण्यात आली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button