कोटा येथे धुळे जिल्ह्यातील ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; ९ ठार, ६ जखमी

कोटा येथे धुळे जिल्ह्यातील ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; ९ ठार, ६ जखमी
धुळे, प्रतिनिधी : राजस्थानमधील कोटा येथे धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फोर्स ट्रॅव्हलर वाहनाचा मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, ६ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनात एकूण १५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. वाहन चालवत असताना चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अपघातग्रस्त वाहनाचा नोंदणी क्रमांक MH-18/CL/3005 असा आहे. मृतांमध्ये धुळे शहरातील शांतीगीत नगर, नवनाथ नगर तसेच शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील रहिवाशांचा समावेश आहे. दुर्घटनेतील ९ मृतदेह कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत, तर ६ जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांची नावे : १. सजन दौलत पवार २. उषाबाई सजन पवार ३. माधवी गणेश पवार ४. साऊ गणेश पवार ५. कैलास भगवान पवार ६. अनिता कैलास पवार ७. जानवी कैलास पवार ८. बाबूलाल दौलत पवार ९. सुशीलाबाई बाबुलाल पवार
जखमींची नावे : १. मनीषा शरद पवार (वय ४१, रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, ता. जि. धुळे) २. मयुरी शरद पवार (वय २०, रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, ता. जि. धुळे) ३. जगदीश कैलास पवार (वय १०, रा. अमराळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) ४. श्रीजीत गणेश पवार (वय ४, रा. शांतीगीत नगर, सुरत बायपास, ता. जि. धुळे) ५. शरद बाबूलाल पवार (वय ४५, रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, ता. जि. धुळे) ६. गणेश सज्जन पवार (वय ३२, रा. शांतीगीत नगर, सुरत बायपास, ता. जि. धुळे)
कोटा येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे मृत व जखमींचा तपशील उपलब्ध झाला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अधिकृत चौकशी व माहिती प्राप्त झाल्यानंतर दुर्घटनेबाबतचे पुढील तपशील समोर येणार आहेत.







