Other

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

‘ब्रह्मगिरीची हिरवाई, गोदावरीची पवित्रता’ नवा नारा

जैन हिल्स येथे नदी संवर्धन अभियानाच्या कार्यशाळेचा समारोप

जळगाव, (प्रतिनिधी) – नद्या केवळ पाण्याचे स्रोत नाहीत, तर त्या संस्कृतीचा श्वास आणि जीवनाचा आधार आहेत. या नद्यांचे अस्तित्व जपण्यासाठी शासन, समाज, संत आणि उद्योग क्षेत्राने एकत्र येत नदी संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करावी असे आवाहन करत ‘ब्रह्मगिरीची हिरवाई, गोदावरीची पवित्रता’ हा नवा नारा जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी जैन हिल्स येथे दिला. नद्या वाचवायच्या असतील, तर केवळ पाणी नव्हे, तर निसर्गाशी असलेले आपले नातेही जपावे लागेल, या भावनेतून निसर्गरक्षणासोबत मानवी गरजांची पूर्तता करणाऱ्या कायद्याचा आग्रह धरावा अशा महत्त्वपूर्ण विचारमंथनाने महाराष्ट्र नदी संवर्धन अभियानाच्या तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला.

कार्यशाळेत विविध विषयांवर सत्रांत चर्चा झाली. सकाळच्या चर्चासत्रात नद्यांच्या स्वच्छता व पावित्र्यात संतांचा सहभाग या विषयावर सविस्तर चर्चा झाली. ‘ब्रह्मगिरीची हिरवाई, गोदावरीची पवित्रता’ आणि ‘नीर, नारी, नदी नारायणी’ या घोषणांनी कार्यशाळेचा समारोप झाला. नद्यांचे पुनरुज्जीवन ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर पुढील पिढ्यांप्रती असलेली जबाबदारी आहे, हा संदेश या कार्यशाळेने दिला. शिवाजी भोईटे यांनी कान्हदेशात कांताई बंधाऱ्याच्या रुपाने पब्लिक, प्रायव्हेट, पार्टनरशीप हा जलसंधारणाचा प्रोजेक्ट जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या पुढाकाराने पूर्ण झाला व त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होऊन कोरडवाहू शेती ओलिताची झाली. शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला या बाबत उपस्थितांना सांगितले. डॉ. अनिता पाटील यांनी आसनखेडा येथे नदीवर झालेल्या कामाबद्दल सांगितले. प्रशांत गायकवाड यांनी तितूर नदीचे वैशिष्ट्ये व नदीसाठी झालेल्या कार्याबद्दल पीपीटी सादरीकरण केले. पाच पाटील मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा याबद्दल प्रभावीपणे सांगितले. विशाल सोमकुल (सागर मित्र) यांनी नद्यांसमवेतच सागराचे व सागराखाली असलेल्या वनस्पतींचे महत्त्व विषद केले. या सोबतच युयुत्सू, आदिनाथ ढाकणे आणि सुनील रहाणे यांनी सादरीकरण केले. तानाजी भोसले यांनी नद्यांशी ५००० शिक्षक आणि ६० हजार विद्यार्थी कसे जोडले याबद्दल सांगून. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील असना नदी या बाबत सविस्तर विचार मांडले. मेजर जनरल संजय विश्वासराव यांनी देखील प्रभावी विचार मांडले. यासोबतच ‘नीर’, ‘नारी’ आणि ‘नदी’ यांचे महत्त्व देखील वक्त्यांनी अधोरेखित केले. गोपाळ पाटील, परीक्षित चिमणकर, जयाजी पाइकराव, नरेंद्र चुघ, भिला पाटील या वक्त्यांनी आपले विचार मांडले.

 

जल पुरुष राजेंद्र सिंह यांनी नद्या आणि पर्वत या महत्त्वाच्या विषयावर सर्वांचे लक्ष केंद्रीत केले. पर्वत संरक्षण कायद्याच्या प्रारूपासह नदी संवर्धनासाठी आवश्यक कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. त्याबाबत सविस्तर विचार मंथन केले. निसर्गाचे रक्षण आणि मानवी गरजांची पूर्तता यांचा समतोल साधणारा कायदा सरकारने लवकर मंजूर करावा याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल व लवकरच शासनदरबारी हे ठराव संमत होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित सहभागी प्रतिनिधींना राजेंद्र सिंह यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश नारायणकर यांनी केले.

……..

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button