HealthSocial

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त उपक्रमाचे आयोजन

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त उपक्रमाचे आयोजन

जळगाव- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय व भुसावळ श्री संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते १० ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भुसावळ नगरपालिका रुग्णालय येथे विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीराचे उद्घाटन प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सामाजिक कार्यकर्त्या रजनी सावकारे, भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, आरोग्य सभापती मेघा वाणी मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या शिबीरात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया, स्तनातील गाठींची तपासणी, गर्भवती महिलांसाठी आयर्न सुक्रोज इंजेक्शन यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या महिला रूग्णांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या शिबीराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी दिक्षा सुरे यांच्याशी 9689680901 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button