Social

जळगावात महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महात्मा बसवेश्वर यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवांतर्गत येत्या १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता शहराच्या मुख्य भागातून भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. ही शोभायात्रा रोज गार्डन येथून निघून नेहरू चौक, शास्त्री टॉवर, चित्रा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा रोज गार्डन येथे विसर्जित होईल.

या सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर मनोज चौधरी आणि नगरसेवक दिलीप पोकळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष संदीप वाणी यांनी या जन्मोत्सव सोहळ्यात आणि शोभायात्रेत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button