भाजप किसान मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा सरचिटणीसपदी सोमनाथ पाटील यांची निवड

भाजप किसान मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा सरचिटणीसपदी सोमनाथ पाटील यांची निवड
भडगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत भाजप किसान मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा सरचिटणीसपदी सोमनाथ शालिग्राम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोमनाथ पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठावान राहून पक्ष संघटन, शेतकरी प्रश्न, सामाजिक उपक्रम तसेच जनसंपर्काच्या माध्यमातून सक्रिय कार्य करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविली आहे.जळगाव पश्चिम मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या विविध समस्या, शेतीसाठी आवश्यक सुविधा, सिंचन, पीकविमा, कृषी योजनांचा लाभ आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी ते अधिक जोमाने कार्य करतील, असा विश्वास पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
निवडीबाबत प्रतिक्रिया देताना सोमनाथ शालिग्राम पाटील यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून शेतकरी हित आणि संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. पक्षाच्या ध्येय-धोरणांना तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच माझे उद्दिष्ट राहील,” असे सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शेतकरी बांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.






