महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप मंडळ क्र. ५ कडून वृक्षारोपण

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप मंडळ क्र. ५ कडून वृक्षारोपण
पिंप्राळा परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पदाधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहराच्या महापौर सौ. दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप मंडळ क्र. ५ (पिंप्राळा परिसर) यांच्या वतीने रविवारी (दि. 13 जुलै 2026) वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला भाजप मंडळ क्र. ५ चे अध्यक्ष अतुल बारी, नगरसेविका जयश्री राहुल पाटील, भाजप महिला मोर्चा मंडळ क्र. ५ च्या अध्यक्षा माधुरी हांडे, महिला मोर्चाच्या पदाधिकारी रेखा कुलकर्णी, मंदा सोनवणे, गीता शुक्ला, चव्हाण मॅडम, मंडळाचे सरचिटणीस उमेश सूर्यवंशी, भाजप जळगाव महानगर चिटणीस राहुल पाटील, महानगर उपाध्यक्ष सागर पाटील, तसेच नूरभाई मोहम्मद, दीपक भुसारी, किरण भोई, राज कोळी, राकेश पाटील, रवी पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. वृक्षारोपणासारख्या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मान्यवरांनी केले.






