भडगावमध्ये भाजपची मोठी कारवाई; विकास महाजन पक्षातून निलंबित!

भडगावमध्ये भाजपची मोठी कारवाई; विकास महाजन पक्षातून निलंबित!
भडगाव (प्रतिनिधी )भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीचा भंग केल्याप्रप्रकरणी भडगाव येथील विकास सुरेश महाजन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे पत्र तालुका अध्यक्ष विनोद नेरकर यांनी प्रसिद्ध केले आहे.
कारवाईचे नेमके कारण काय?
पक्ष प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, विकास महाजन यांचे ध्येय-धोरण आणि वर्तन हे पक्षविरोधी असल्याचे समोर आले आहे. त्यांनी पक्षाला दिलेला लेखी खुलासा खोटा असून, ते इतर कार्यकर्त्यांना फितवत असल्याचेही निदर्शनास आले आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध चिथावणीखोर विधाने करणे आणि शिस्तभंग करणे या कारणांमुळे त्यांचे प्राथमिक व सक्रिय सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
पक्षाकडून कडक भूमिका
भाजपा युवा मोर्चाच्या पदावरूनही त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात पक्षांतर्गत शिस्त राखण्यासाठी ही कडक पावले उचलली गेल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे…





