Social

चौगाव किल्ल्यावर राजा शिवछत्रपती परीवाराची मोहीम संपन्न

चौगाव किल्ल्यावर राजा शिवछत्रपती परीवाराची मोहीम संपन्न
चौगाव (प्रतिनिधी) चौगाव किल्ला या ऐतिहासिक किल्ल्यावर दि १६/८/२०२६ रविवारी स्वच्छता मोहीम घेण्यात आली.राजा शिवछत्रपती परीवाराच्या जळगाव विभागाची ती नव्वदवी मोहीम होती.राजा शिवछत्रपती परीवाराकडून महाराष्ट्रातील एकूण तेवीस जिल्ह्यांमध्ये विविध गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते.प्रत्येक विभागातून महीन्यातील एक रविवारी विभागात येणार्या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम घेतली जाते.तसेच रक्तदान मोहीम, वृक्षारोपण मोहीम घेतली जाते.
यावेळी चौगाव किल्ल्यावर वन विभागाचे मार्गदर्शन विशेष सहकार्याने स्वच्छता मोहीम घेण्यात आली.या मोहीमेला एकूण सत्तावन्न मावळे व रणरागिणी उपस्थित होते.सुरवातीला तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर व राजेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व राष्ट्रगीत म्हणुन शिवरायांच्या जय घोषात वृक्षारोपण, जंगलात सीडबाॅल टाकून तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर परीसर व किल्ला परीसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला.किल्यावरील मुख्य प्रवेशद्वारावरील गवत हाताने उपटून टाकण्यात आले.त्यानंतर मावळ्यांनी निसर्गरम्य परिसरात भटकंती करून मोहीमेची सांगता झाली.
दरम्यान ऊन वारा व पावसामुळे किल्ल्यावरील ऐतिहासिक अवशेषांची झीज होत आहे.तरी हा ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी याचे शक्य तेवढ्या लवकर साल्हेर या वन विभागातील किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले त्याच धर्तीवर पुरातत्व, महसूल व वन विभागामार्फत संयुक्त सर्वेक्षण होऊन राज्य संरक्षित स्मारक घोषित होणे साठी प्रस्ताव सादर करण्यात यावा अशी मागणी उपस्थित सर्व मावळ्यांनी केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button