Other
जिल्हाधिकारी कार्यालयात दिवंगत अजित पवार यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात दिवंगत अजित पवार यांना अभिवादन
जळगाव, दि. २२ जुलै जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी स्व.अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले .
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी मंजुषा घाटगे , उपविभागीय अधिकारी विनय गोसावी तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
******






