Crime

जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात मोठा गैरव्यवहार उघड

तब्बल ४३ जणांनी बनावट सह्या व शिक्क्यांच्या आधारे घेतले दाखले; तहसीलदारांनी दाखल केली तक्रार

जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात मोठा गैरव्यवहार उघड

तब्बल ४३ जणांनी बनावट सह्या व शिक्क्यांच्या आधारे घेतले दाखले; तहसीलदारांनी दाखल केली तक्रार

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, ४३ जणांनी तहसीलदारांच्या बनावट सह्या व शिक्क्यांचा वापर करून खोटे जन्म आणि मृत्यू दाखले मिळवले असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी नायब तहसीलदार नवीनचंद अशोक भावसार यांनी शहर पोलीस ठाण्यात ४३ जणांविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली असून, या प्रकाराच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

फक्त ७ अर्ज वैध, ४३ अर्ज बोगस
महापालिकेच्या संबंधित विभागाने अलीकडच्या काळात एकूण ५० जन्म-मृत्यू दाखले जारी केले होते. मात्र काही दाखल्यांच्या प्रामाणिकतेवर संशय व्यक्त झाल्यानंतर तहसील कार्यालयाने चौकशी केली. तपासात फक्त ७ अर्ज वैध, तर उर्वरित ४३ अर्ज बनावट व अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले.

या ४३ बनावट दाखल्यांपैकी ११ अर्जांचे नाव तहसील कार्यालयाच्या नोंदवहीत सुद्धा नोंदलेले नाही, म्हणजे हे अर्ज अधिकृतपणे कार्यालयात सादरही करण्यात आले नव्हते. ही नोंदणी संपूर्णपणे बनावट व फसवणूक करणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात जळगाव शहर, नशिराबाद, तसेच मुंबई आणि यावल येथील नागरिकांचा समावेश आहे. संबंधित तक्रारीत चांद महंमद बागवान, असलम खान, अशफाक बागवान, बुशरा खान, मोहसिन चांद महंमद, समीर खान, अफजल खान, आरिफ खान, समशेर बेग, तोसिफ शहा, कनिज रज्जाबी, अब्दुल्ला सय्यद, खान असदुल्ला, नुसरत बानो, मोहम्मद वसीम, बिस्मिल्लाह खान, मोहम्मद अखिल, अमरीन पटेल, जाकीर तांबोळी, तसलीमा बी यांच्यासह इतर अनेक संशयितांची नावे नमूद करण्यात आली आहेत.

या प्रकरणामुळे महापालिकेच्या नोंदणी प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला असून, या प्रकारातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी व प्रशासनातील संलिप्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button