Crime

विजेच्या धक्क्याने ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

भडगाव तालुक्यातील कोठली येथील घटना

भडगाव प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील कोठली येथील 9 वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी ) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुणाल विलास भिल (वय 9, रा. कोठली, ता. भडगाव) हा युवक जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. यावेळी त्याला विजेचा धक्का लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गंभीर अवस्थेत त्याला भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद दाखल करण्यात आली असून पुढील तपास भडगाव पोलीस करत आहेत.अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कोठली गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. तरुण वयातच काळाने घाला घातल्याने नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.मयत बालकाच्या पश्चात आजी बाबा, आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. कुणाल हा एकलूता एक असल्याने त्यांच्या अंत्यविधी वेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button