Sport

क्रिकेट चषक स्पर्धेत अमळनेर पोलीस  टीमचा दणदणीत विजय

PSI समाधान गायकवाड ‘मॅन ऑफ द सिरीज’ व ‘बेस्ट बॅट्समन’

 क्रिकेट चषक स्पर्धेत अमळनेर पोलीस  टीमचा दणदणीत विजय

PSI समाधान गायकवाड ‘मॅन ऑफ द सिरीज’ व ‘बेस्ट बॅट्समन’

अमळनेर : जयनील तसेच परिवर्तन क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित क्रिकेट चषक स्पर्धेत अमळनेर पोलीस क्रिकेट टीमने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता.

अंतिम सामन्यात पोलिसांची बाजी

स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या अमळनेर पोलीस क्रिकेट टीमने अंतिम सामन्यातही आपली विजयी घोडदौड कायम ठेवत प्रतिस्पर्धी संघावर मात केली. अंतिम सामन्यातील विजयासह संघाने चषकावर आपले नाव कोरले.

समाधान गायकवाड यांची धडाकेबाज फलंदाजी

अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी संपूर्ण स्पर्धेत आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना ‘मॅन ऑफ द सिरीज’ तसेच ‘बेस्ट बॅट्समन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे एका सामन्यात गायकवाड यांनी अवघ्या ३४ चेंडूंत तब्बल १३४ धावा करत मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्यांच्या या धडाकेबाज खेळीमध्ये तब्बल १८ षटकारांचा पाऊस पडला.

अमळनेर पोलीस क्रिकेट टीमच्या या शानदार विजयामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button