Other

जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई : लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई : लाखोंचा मुद्देमाल जप्त

हातभट्टी, सट्टा-जुगार व दारूबंदी उल्लंघनावर एकाचवेळी धाडी : ८५ गुन्हे दाखल, जिल्हाभरात विशेष मोहीम

जळगाव : जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी एकाचवेळी समन्वय साधत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. हातभट्टी दारू, सट्टा-जुगार तसेच प्रोहिबिशन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर धाडी टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून अवैध धंद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले. एकूण ८५ गुन्हे दाखल करण्यात आले असून हातभट्टी दारू निर्मिती व साठ्यावर कारवाई करत तब्बल २४,६७,४८५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये ८३ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
सट्टा-जुगार प्रकरणांमध्येही पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाई करत एकूण २,०२,१९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ६९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दारूबंदी कायदा उल्लंघनाच्या (बाळगणे/पिणे/वाहतूक) प्रकरणांमध्येही कारवाई करत १९ गुन्हे दाखल करण्यात आले असून १,४१,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३८ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर (चाळीसगाव), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनीही आपल्या परिसरात अवैध धंदे सुरू असल्यास निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button