Other

दीपक तरुण मंडळाचे पाटपूजन उत्साहात संपन्न

दीपक तरुण मंडळाचे पाटपूजन उत्साहात संपन्न

जळगाव,  – दीपक तरुण मंडळ, रथ चौक येथे रविवार दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी गणेश उत्सवाचा शुभारंभ करण्यासाठीचा पाटपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
मंडळाचे खजिनदार दीपक ठाकूर यांचे हस्ते पूजन करण्यात आले. मंडळाचे यंदा ५४ वे वर्ष आहे. कार्यक्रमाचे सुरुवातीस मंडळाचे बाल सदस्य शौर्य वाणी यांनी गणेश स्तोत्र सादर केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भवानी मंदिर संस्थांचे गुरुजी महेश त्रिपाठी, श्रीराम मंदिर संस्थान तर्फे श्रीधर जोशी, प्रवचनकार देवदत्त मोरदे गुरुजी, जळगाव शहराचे आमदार श्री.राजुमामा भोळे, शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जैस्वाल, श्रीराम रथ उत्सवाचे प्रमुख प्रभाकर पाटील, नगरसेवक निलेश आबा तायडे, माजी नगरसेवक मुकुंद सोनवणे, दीपक जोशी, मुकुंद मेटकर, विवेक जगताप उपस्थित होते. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व सल्लागार श्री. गोविंद अण्णा कासार व मुकुंद कासार यांचेहस्ते राजुमामा यांचा सत्कार कारणात आला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष कवी सपकाळे, उपाध्यक्ष प्रमोद तांबट, निलेश कासार, सागर शिंपी, मनोज सपकाळे, अनुज शर्मा यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन मनोज तांबट व प्रास्ताविक संजय वाणी यांनी केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button