Other

ईद-ए-मिलाद मिरवणुकीमुळे जळगाव शहरातील वाहतुकीत बदल

ईद-ए-मिलाद मिरवणुकीमुळे जळगाव शहरातील वाहतुकीत बदल

सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत काही मार्गांवर वाहतूक बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

जळगाव | प्रतिनिधी : ईद-ए-मिलाद निमित्त जळगाव शहरात बुधवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

मिरवणुकीचा मार्ग शाहूनगर, नेहरू चौक, शिवाजीनगर, टॉवर चौक, घाणेकर चौक, मिलापुरा चौकी, सुभाष चौक, बेंडाळे चौक, नेरी नाका आणि कब्रस्तान असा राहणार आहे. या मार्गावर सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तात्पुरता प्रवेश बंद राहणार आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३(१)(ब) अन्वये वाहतुकीतील बदलाबाबत अधिसूचना जारी केली आहे. मिरवणूक मार्गाला लागून असलेल्या बाह्य मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार असून, वाहतुकीत बदल करण्यात आलेल्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग

१. जळगाव ते चोपडा, यावल, कानळदा, नांद्रा ये-जा करणारी वाहतूक :
एसटी बस व अवजड वाहनांसाठी स्वातंत्र्य चौक – आकाशवाणी चौक – रिंगरोड – सुरेश कलेक्शन (रेल्वे उड्डाणपूल) या मार्गाचा वापर करावा.

२. जळगाव ते असोदा, भादली ये-जा करणारी वाहतूक :
एसटी बस व अवजड वाहनांसाठी स्वातंत्र्य चौक – आकाशवाणी चौक – अजिंठा चौक – कालिका माता – जुना खेडी मार्गाचा वापर करावा.

३. नवीन बसस्थानकाकडून कोर्ट चौक, टॉवर चौकाकडे जाणारी वाहतूक :
हलक्या व मध्यम वाहनांसाठी ला.ना. चौक – वनिता हॉस्पिटल – गोकुळ स्वीट मार्ट – रिंगरोड या मार्गाचा वापर करावा.

४. टॉवर चौकाकडून नवीन बसस्थानकाकडे ये-जा करणारी वाहतूक :
टॉवर चौक – चित्रा चौक – कोर्ट – ला.ना. चौक या मार्गाचा वापर करावा.

५. अजिंठा चौक, एसटी वर्कशॉप, नेरी नाका व बेंडाळे चौकाकडे जाणारी वाहतूक :
अजिंठा चौक – इच्छादेवी चौक – आकाशवाणी चौक किंवा अजिंठा चौक – इच्छादेवी चौक – पांडे चौक – स्वातंत्र्य चौक या मार्गांचा वापर करावा.

६. शिवाजीनगरकडून टॉवर चौकाकडे ये-जा करणारी वाहतूक :
गेंदालाल मिल – दूध फेडरेशन – रिंगरोड उड्डाणपूल या मार्गाचा वापर करावा.

ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखा व जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button