EducationSocial

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; बालचमूंसाठी चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; बालचमूंसाठी चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि पालकशाळा यांचा संयुक्त उपक्रम; भाऊंचे उद्यान येथे प्रवेश विनामूल्य

जळगाव, प्रतिनिधी : दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळा सुरू होत असताना बालचमूंना आणि त्यांच्या पालकांना एक अनोखा व आनंददायी अनुभव देण्यासाठी जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव – पर्व २’ चे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा दोन दिवसीय महोत्सव येत्या शनिवार, दि. २८ आणि रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दररोज सायंकाळी ५.३० वाजता जळगाव येथील भाऊंचे उद्यान (ॲम्फी थिएटर) येथे संपन्न होणार आहे.

दर्जेदार बालचित्रपटांसोबतच ‘जादूश्री’ चेतनकुमार यांचे जादूचे प्रयोग यंदाच्या महोत्सवात बालचमूंसाठी मनोरंजनाची दुहेरी मेजवानी असणार आहे. बालविश्वाशी निगडित दर्जेदार आणि मनोरंजक चित्रपटांच्या प्रदर्शनासोबतच राष्ट्रीय ‘जादूश्री’ पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध युवा जादूगार चेतनकुमार यांचे अद्भुत व अविश्वसनीय जादूचे प्रयोग हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. त्यांच्या हातचलाखीचे आणि विस्मयकारक प्रयोग मुलांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहेत.

पालक आणि पाल्यांसाठी निखळ आनंदाची पर्वणी आजच्या धावपळीच्या युगात पालक आणि पाल्यांनी एकत्र बसून निखळ आनंद लुटावा आणि पालकांनीही आपले बालपण पुन्हा अनुभवावे, या उदात्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला असून, जळगाव शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी, बालचमू आणि पालकांनी या दोन दिवसीय चित्रपट व जादू महोत्सवाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button