Health

महादेव हॉस्पिटलमध्ये आता ईएनटी तज्ज्ञ डॉ. गगन अग्रवाल यांची सेवा उपलब्ध; कान, नाक व घशाच्या आजारांवर अत्याधुनिक उपचार

महादेव हॉस्पिटलमध्ये आता ईएनटी तज्ज्ञ डॉ. गगन अग्रवाल यांची सेवा उपलब्ध; कान, नाक व घशाच्या आजारांवर अत्याधुनिक उपचार

दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णांना मिळणार तपासणी व वैद्यकीय सल्ल्याची सुविधा

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव व परिसरातील रुग्णांसाठी एक महत्त्वाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाली असून, येथील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कान, नाक व घशाच्या आजारांवरील उपचारांसाठी डॉ. गगन प्रवीण अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा सुरू झाली आहे. एमबीबीएस आणि एमएस (ईएनटी) अशी उच्च शैक्षणिक पात्रता असलेले डॉ. अग्रवाल हे कान, नाक, घसा तसेच डोके व मानेच्या विविध आजारांबाबत रुग्णांना तपासणी, वैद्यकीय सल्ला व उपचारांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

नामांकित संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण डॉ. गगन अग्रवाल यांनी मुंबई येथील प्रसिद्ध ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व सर जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (कृष्णा विश्व विद्यापीठ) येथून त्यांनी ईएनटी विषयात एमएस ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.

विविध शस्त्रक्रियांचे विशेष प्रशिक्षण त्यांना कान, नाक व घशाच्या रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात (OPD) तपासणी, आंतररुग्ण सेवा तसेच आपत्कालीन रुग्ण व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव व प्रशिक्षण आहे. कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया (टायम्पॅनोप्लास्टी), नाकाच्या हाडाची शस्त्रक्रिया (सेप्टोप्लास्टी), सायनससंबंधी एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स व ॲडिनॉइड्सवरील शस्त्रक्रिया तसेच इतर अत्याधुनिक ईएनटी प्रक्रियांचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. याशिवाय त्यांनी विविध राष्ट्रीय वैद्यकीय कार्यशाळा व लाईव्ह सर्जिकल ओटोलॉजी कार्यशाळांमध्ये सहभाग नोंदवला असून, त्यांच्याकडे बेसिक व ॲडव्हान्स्ड कार्डिओव्हॅस्क्युलर लाइफ सपोर्टचे (BLS/ACLS) प्रमाणपत्रही आहे.

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल हे दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णांसाठी उपलब्ध राहणार आहेत. जळगाव शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी कान, नाक व घशाच्या विविध तक्रारींवर निदान व उपचारांसाठी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button