
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरातील भाजीपाला मार्केट आज बंद; शेतकऱ्यांनी माल विक्रीस न आणण्याचे आवाहन
कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश आंदोलन व आमरण उपोषण; भाजीपाला असोसिएशनचा पाठिंबा
अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर येथील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, या मागणीसह विविध मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आज शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी जनआक्रोश आंदोलन व बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अमळनेर येथील भाजीपाला मार्केट आज बंद ठेवण्याचा निर्णय भाजीपाला असोसिएशनने घेतला आहे.
लिलाव मार्केटही राहणार बंद या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजीपाला लिलाव मार्केटही बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला भाजीपाला व शेतीमाल विक्रीसाठी मार्केटमध्ये आणू नये, असे आवाहन किरकोळ भाजीपाला विक्रेता असोसिएशन आणि भाजीपाला अडत असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
आंदोलनामुळे शहरातील भाजीपाला खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर परिणाम होणार असून, शेतकरी आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.







