Crime

बनावट नोटा , दुतोंडी मांडूळ साप देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी पकडली

हलखेडा, मधापुरी गावांमध्ये राबविले कोंबिंग ऑपरेशन

बनावट नोटा , दुतोंडी मांडूळ साप देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी पकडली

हलखेडा, मधापुरी गावांमध्ये राबविले कोंबिंग ऑपरेशन

एलसीबी ,मुक्ताईनगर पोलीस आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या ६ पथकांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी
काळी हळद, पंधरा बिबा, दोन तोंडी साप, बनवत नोटा देण्याचे आमिष देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या घटना मुक्ताईनगर , आणि बुलढाणा जिल्ह्यात घडल्या होत्या . याप्रकरणी गुन्हे दाखल असून या फरार संशयित आरोपीना पकडण्यासाठी मुक्ताईंआगर तालुक्यातील हलखेडा, मधापुरी गावांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा ,मुक्ताईनगर पोलीस आणि उपविभागीय पोलिसांच्या ६ पथकांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे.

समिर हकिम पवार रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव , देश नरवीलाल पवार रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव,योगेश अंजुर पवार रा, हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव , निखील सवलत पवार रा, हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव , हकीम रफिक पवार रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव अशी अटक केलेल्या पाच संशयितांची नावे आहेत . या सर्व आरोपींवर मुक्ताईनगर,बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा , जळगाव जामोद या ठिकाणी विविध गुन्हे दाखल आहेत .

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार , पोलिस अधिक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पो.स्टे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, जळगाव जामोद पोलीस ठाणे हद्दीत काळी हळद, पंधरा बिबा, दोन तोंडी साप, बनवत नोटा देण्याचे आमिषाने अनेक घटना घडल्या असून त्यबाबत गुन्हे दाखल असल्याने त्यातील आरोपी अटक करून अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार उप विभागीय पोलिस अधिकारी, राजकुमार शिंदे मुक्ताईनगर विभाग यांचे नेतृत्वात कु-हा दुरक्षेत्र अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकांनी हकीम पवार, समीर पवार,देश पवार ,योगेश अंजुर पवार,निखील सवलत पवार या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या .

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक, डॉ. श्री महेश्वर रेड्डी जळगाव यांचे आदेशानुसार अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, जळगाव परिमंडळ यांचे मार्गदर्शनानुसार मा. उप विभागिय पोलिस अधिकारी राज कुमार शिंदे मुक्ताईनगर विभाग यांचे नेतृत्वात पोलिस निरिक्षक श्री बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, पोउपनि शरद बागल, पोउपनि गणेश वाघमारे, पोउपनि दत्तात्रय पोटे स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव स्टाप, पोलिस निरिक्षक नागेश मोहिते मुक्ताईनगर पोलिस स्टेशन व पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी, तसेच कु-हा दुरक्षेत्राचे सफौ संतोष चौधरी, सफौ/ अश्पाक शेख, पोहेकाँ संजय पवार, पोना मोतीलाल बोरसे, पोना प्रदिप इंगळे, पोना संदिप वानखेडे ,अनिल देवरे रविंद्र धनगर, प्रशांत चौधरी, गोविंद सुरवाडे, गोविंदा पवार, सागर सावे, सुनिल मोरे, प्रविण जाधव, अंकुश बाविस्कर मपोअश्विनी बोदडे, तसेच क्यु.आर.टी पथक यांनी केली आहे

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button