Social

गोदावरी लक्ष्मी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा उत्साहात

गोदावरी लक्ष्मी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा उत्साहात

संचालक राजेंद्र शिवराम महाजन यांचे हस्ते सपत्नीक पूजन; मान्यवरांसह कर्मचारी व सभासदांची उपस्थिती

जळगाव : गोदावरी लक्ष्मी बँकेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त बँकेच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. बँकेचे संचालक राजेंद्र शिवराम महाजन व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
याप्रसंगी गोदावरी बँकेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, बँकेचे व्हाइस चेअरमन सोनु भंगाळे, सुभाष पाटील यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ,व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद तसेच जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतिष मदानेजी व सहकार भारती चे राज्य स्तरीय अध्यक्ष संजयजी बिर्ला यांची विशेष उपस्थिती होती. बँकेच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी बँकेच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. सहकार, विश्वास आणि आर्थिक सेवांच्या माध्यमातून बँकेने केलेल्या वाटचालीचा यावेळी गौरव करण्यात आला. धार्मिक आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा उत्साहात पार पडला

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button