Education

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

रॅगींग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंधावर संयुक्त सभा

जळगाव – महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी रॅगींग प्रतिबंधात्मक कायदा अंमलात आला आहे. रॅगींग करणे हा कायद्याच्यादृष्टीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सांगितले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रॅगींग प्रतिबंधात्मक संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. माया आर्विकर, डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. सी.डी. सारंग, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, कांचन रोटे, महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वराज सुर्या, सिद्दीका मुस्कान यांच्यास समितीचे सदस्य उपस्थित होते. संयुक्त सभेच्या सुरूवातीला प्रा. डॉ. बापुराव बिटे यांनी रॅगींग या प्रकाराविषयीची माहिती आणि त्याचे परिणाम याबाबत सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना आदराची भावना ठेवली पाहीजे. कुठल्याही परीस्थितीत महाविद्यालयात रॅगींग खपवून घेतली जाणार नाही. रॅगींग करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आयुष्य उद्ध्वस्त करणारा प्रकार असल्याचे डॉ. सोळंके यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी देखील विद्यार्थ्यांना रॅगींग प्रतिबंधाविषयीच माहिती देत महाविद्यालयाचा परिसर हा रॅगींग मुक्त परिसर असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी रॅगींग प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाला एमबीबीएस अभ्यासक्रमाचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील लिपीकांसह सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button