Social

ऑल इंडिया कंजरभाट जातीय क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

ऑल इंडिया कंजरभाट जातीय क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर एकजुटीचा संदेश देणारे प्रभावी माध्यम – राहुल नेतलेकर 

जळगाव : जळगाव येथील जी. एस. मैदानावर ऑल इंडिया कंजरभाट जातीय क्रिकेट दिवस रात्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे उद्घाटन नरडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल नेतलेकर लखन नेतले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

यावेळी बिरजू नेतलेकर, मोहन गारुंगे, नरेश बागडे, शशिकांत बागडे, मोहन चव्हाण, संजय मोती, प्रदीप नेतलेकर, योगेश बागडे, मंगल गुमाने, संतोष गारुंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना राहुल नेतलेकर म्हणाले की, “क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर तो एकजुटीचा संदेश देणारा खेळ आहे. क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू कितीही चांगला असला, तरी संपूर्ण संघाची साथ मिळाल्याशिवाय विजय मिळवता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे समाजातही एखादी व्यक्ती मोठी होऊन उपयोग नाही, तर संपूर्ण समाजाने एकत्र येऊन प्रगती करणे गरजेचे आहे.”

समाजातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळावे तसेच समाजबांधवांमध्ये एकोपा, बंधुभाव आणि संघटन भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्तिक बाटुंगे यांनी सांगितले.

या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदाबाद येथील एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत.13 ते 16 तारखेपर्यंत दिवस रात्र स्पर्धा होत असून 16 तारखेला फायनल
स्पर्धा होणार असून
*स्व. गणेश नेतलेकर यांच्या स्मरणार्थ लखन नेतलेकर व राहुल नेतलेकर भाईराजा ग्रुप नरडाणा तर्फे*
*प्रथम बक्षीस 55555*
*द्वितीय 33333 रोख बक्षीस*
*यासह असे 1 लाख पर्यंत रोख बक्षीस देण्यात आले आहे.*

विविध शहरांतील समाजबांधव एकाच मैदानावर एकत्र आल्याने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून समाजातील तरुणांना एकत्र आणण्याचा आणि समाजात एकतेची भावना अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

स्पर्धा यशस्वितेसाठी
कार्तिक बाटुंगे, राज नेतलेकर, गणेश बागडे, राज गागडे, गौतम टीलंगे,गोविंद दहियेकर, यांच्या सह युवकांनी परिश्रम घेतले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button