EducationSocial

स्वयंपाकघरातच दडलेय आरोग्याचे रहस्य; विपश्यनेतून मनःशांतीचा मार्ग!

स्वयंपाकघरातच दडलेय आरोग्याचे रहस्य; विपश्यनेतून मनःशांतीचा मार्ग!

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विपश्यना व निसर्गोपचारावर मार्गदर्शन

जळगाव : आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावपूर्ण जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येसाठी औषधांवर अवलंबून न राहता योग्य आहार, घरातील नैसर्गिक पदार्थ, नियमित व्यायाम आणि मानसिक शांततेच्या माध्यमातून आरोग्य कसे जपता येईल, याविषयी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मेडिटेक इंडियाचे गिरीष जैन उपस्थित होते.
त्यांनी स्वयंपाकघरातील सहज उपलब्ध असणारे हळद, आले, जिरे, मेथी, लसूण, दालचिनी, आवळा यांसारखे पदार्थ योग्य प्रमाणात आहारात समाविष्ट केल्यास आरोग्याला कशा प्रकारे मदत होऊ शकते, याची माहिती दिली.आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहाराचे महत्त्वलठ्ठपणा कमी करण्यासाठी संतुलित आहार, योग्य प्रमाणात अन्नसेवन आणि नियमित चालणे आवश्यक आहे. अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी वेळेवर जेवणे, अतितिखट व तेलकट पदार्थ टाळणे आणि पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. मधुमेह नियंत्रणासाठी साखरयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे, तंतुमय आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. रक्तदाबासाठी मीठाचे प्रमाण कमी ठेवणे, तर सांधेदुखीमध्ये वजन नियंत्रण आणि नियमित हालचाल फायदेशीर ठरते, असे त्यांनी सांगितले.घरगुती पदार्थ आणि औषधी वनस्पतींचा वापर करताना योग्य माहिती व प्रमाण समजून घेणे आवश्यक असून, हे उपाय डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांना पर्याय ठरू शकत नाहीत, याकडेही लक्ष वेधण्यात आले.विपश्यनेतून मानसिक आरोग्याचा मार्गशारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या तणावपूर्ण वातावरणात मन शांत ठेवण्यासाठी विपश्यना हा प्रभावी ध्यानमार्ग असल्याचे गिरीष जैन यांनी सांगितले. विपश्यनेच्या माध्यमातून स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करणे, मनावर नियंत्रण मिळवणे आणि संयम विकसित करणे शक्य होते. यासाठी इगतपुरी येथील दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.नैसर्गिक आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य यांचा समतोल राखून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश या मार्गदर्शनातून देण्यात आला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button