Crime

गोराडखेड्यात कन्नडच्या डॉक्टराची निर्घृण हत्या; मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकला

जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याचा  अंदाज; दोन संशयितांना अटक

गोराडखेड्यात कन्नडच्या डॉक्टराची निर्घृण हत्या; मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकला

जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याचा  अंदाज; दोन संशयितांना अटक

पाचोरा (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोराडखेडा येथे डॉ. संजय तेली यांची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

डॉ. संजय तेली हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे वास्तव्यास होते. ते मागील चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्यामागे हत्येचा प्रकार असल्याचे उघड झाले. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पोत्यात भरून बहुळा धरणात फेकण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली.

जमिनीच्या व्यवहारातून वाद; हत्येचा संशय

प्राथमिक माहितीनुसार, गोराडखेडा येथे जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून डॉ. तेली यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. व्यवहारादरम्यान वाद उफाळल्यानंतर संशयितांनी त्यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

धरणात शोधमोहीम; पोलिसांकडून तपास सुरू

डॉ. तेली यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी बहुळा धरणात दुपारपासून शोधमोहीम सुरू होती. रात्रीच्या वेळी शोधकार्यात अडथळे येत असल्याने पुढील शोधकार्य सकाळी पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button