गाहक न्यायालय परिसरातील रस्त्याचे दोन महिन्यांत तीन तेरा

गाहक न्यायालय परिसरातील रस्त्याचे दोन महिन्यांत तीन तेरा
गजानन मालपुरे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
जळगाव : येथील गाहक न्यायालयाच्या शासकीय इमारतीच्या परिसरात दोन महिन्यांपूर्वीच रस्त्याचे काम झाले… आणि दोनच महिन्यांनी रस्त्याचे तीन तेरा झालेले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन सादर केले आहे.
या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे झालेले आहे. रस्त्याचे बांधकाम करताना कुठल्याही तांतिक बाबीचा अवलंब न झाल्याने रस्त्याला लगेचच तडे पडायला सुरुवात झाली. कार्य क्षेतिय अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराने हे तडे सिमेंटचे पाणी टाकून बुजविण्याचा पयत्न केला. अर्थात त्यालाही यश आलेले नाही. याउपर कार्य क्षेतिय अधिकारी आणि ठेकेदाराचे संगनमत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. मालपुरे यांनी निवेदनात म्हटले आहे, की रस्त्याचे काम करताना निविदेत नमूद निकषांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्याचे काम नव्याने करून घेण्यात यावे. संबंधित ठेकेदाराला कायमस्वरूपी ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशी मागणीही मालपुरे यांनी केली आहे. संबंधित ठेकेदारावर तसेच कार्यक्षेतीय अधिकाऱ्यावर काय कारवाई केली, त्यासंबंधीच्या आदेशाची पतही कार्यकारी अभियंत्यांनी सादर करावी, असेही मालपुरे यांनी नमूद केले






