Other

गुरुंच्या चरणी कृतज्ञतेचे वंदन! डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरुपौर्णिमा भक्तिभावात साजरी

गुरुंच्या चरणी कृतज्ञतेचे वंदन! डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरुपौर्णिमा भक्तिभावात साजरी6

जळगाव : भारतीय संस्कृतीत गुरु हे ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्यांचे अखंड प्रेरणास्थान मानले जाते. या गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा गुरुपौर्णिमेचा सोहळा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे प्रेरणास्थान व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन करून वंदन करण्यात आले तसेच त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

विद्यार्थी परिषद – २०२६ यांच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके,डॉ. एन. एस. अरविकार, वैद्यकीय संचालक, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरु वंदनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कला, विचार आणि सादरीकरणातून गुरुंचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान प्रभावीपणे मांडले.

कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन आर्य जोगदंड आणि अरमान शेख यांनी केले. दिया राठोड, ऐश्वर्या शेठ आणि देवर्ष राऊत यांनी गुरुंचे जीवनातील स्थान, भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा आणि गुरुंबद्दलची कृतज्ञता यावर प्रेरणादायी विचार व्यक्त केले.

मधुरा बढे आणि आशिष रथ यांनी सादर केलेल्या हृदयस्पर्शी कवितांनी उपस्थितांच्या भावना जागृत केल्या, तर भावेश जाधव यांनी गुरु-शिष्य नात्यावरील भावपूर्ण गीत सादर करून संपूर्ण सभागृह भावविवश केले. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी उत्कर्ष भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानत, गुरुंच्या ऋणातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने करावा, असे आवाहन केले.

गुरुपौर्णिमेचा हा सोहळा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम न राहता, गुरुंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा, ज्ञानाचा गौरव करण्याचा आणि भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेची मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रेरणादायी उत्सव ठरला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button