CrimeSocial

खेलो इंडिया २०२५: जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ट्रॅक सायकलिंगमध्ये तिहेरी पदकांची कमाई

सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राचे नाव रोशन

जळगाव l महापोलीस न्यूज 10 मे 2025 l दिल्लीतील ७ व्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ मध्ये जळगावच्या सायकलपटू आकांक्षा गोरख म्हेत्रेने ट्रॅक सायकलिंगमध्ये तिहेरी यश मिळवले आहे. तिने स्प्रिंट प्रकारात सुवर्ण, टाइम ट्रायलमध्ये रौप्य आणि स्क्रॅच रेसमध्ये कांस्य पदक पटकावून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. आता ती बिहारमध्ये १३ ते १४ मे रोजी होणाऱ्या रोड सायकलिंग स्पर्धेत आत्मविश्वासाने सहभागी होणार आहे.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात ६ ते ८ मे दरम्यान झालेल्या या स्पर्धेत २१ राज्यांतील सायकलपटूंनी भाग घेतला. आकांक्षाने मुलींच्या ७.५ किमी स्क्रॅच रेसमध्ये ११ मिनिटे ५१.६४९ सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले. टाइम ट्रायलमध्ये ३८ मिनिटे ७४२ सेकंद वेळेसह रौप्य पदक मिळवले.

दुसऱ्या दिवशी स्प्रिंट प्रकारात तिने वेग आणि कौशल्याच्या जोरावर सुवर्ण पदकावर नाव कोरले. केरिन प्रकारात तिने अटीतटीच्या तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धात्मक वेळ नोंदवली, परंतु अंतिम फेरीत तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

आकांक्षा ही जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे सहकारी गोरख म्हेत्रे आणि अंजली म्हेत्रे यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांच्यासह सर्वांनी कौतुक केले आहे. आता आकांक्षा बिहारच्या पटणा येथे होणाऱ्या रोड सायकलिंग स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button