Maharashtra

IAS योगेशकुमार मीना जळगावचे नवे प्रांताधिकारी; हिंगोलीतून जळगावात बदली

राज्य शासनाकडून १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विद्यमान प्रांताधिकारी विनय गोसावींच्या पुढील नियुक्तीकडे लक्ष

IAS योगेशकुमार मीना जळगावचे नवे प्रांताधिकारी; हिंगोलीतून जळगावात बदली

​राज्य शासनाकडून १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विद्यमान प्रांताधिकारी विनय गोसावींच्या पुढील नियुक्तीकडे लक्ष

​जळगाव: प्रतिनिधी राज्य शासनाने गुरुवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची नवीन यादी प्रसिद्ध केली असून, जळगावचे प्रांताधिकारी म्हणून २०२४ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी योगेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या हिंगोली येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून सोमवारी जळगावात येऊन प्रांताधिकारी पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. विद्यमान प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या बदलीचे आदेश निघाल्याने जळगावच्या प्रशासनात फेरबदल झाले आहेत.

​योगेशकुमार मीना यांनी बी.टेक.ची पदवी प्राप्त केली असून प्रशासकीय सेवेत आल्यापासून त्यांनी विविध विभागांत आपल्या कामाची छाप पाडली आहे. हिंगोलीतील सहायक जिल्हाधिकारी पदावरील अनुभवानंतर आता जळगावसारख्या महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रांताची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

महसूल प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख करणे, आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन आणि नागरिकांच्या तक्रार निवारणाला प्राधान्य देणे हे त्यांच्यापुढील मुख्य आव्हान असणार आहे. दुसरीकडे, पदमुक्त झालेले प्रांताधिकारी विनय गोसावी यांना अद्याप नवीन पदस्थापना देण्यात आलेली नसून शासनाच्या पुढील आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नव नियुक्त प्रांताधिकारी मीना सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर जळगावच्या महसूल कारभाराला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button