CrimeMaharashtra

कोंडाईबारी घाटात मृत्यूचा थरार!

अपघातग्रस्त ट्रकवर भरधाव कंटेनरची भीषण धडक; चालकासह दोघे गंभीर

कोंडाईबारी घाटात मृत्यूचा थरार!

अपघातग्रस्त ट्रकवर भरधाव कंटेनरची भीषण धडक; चालकासह दोघे गंभीर

विसरवाडी I संजय वाणी  धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात झाला. यापूर्वी अपघातग्रस्त होऊन महामार्गावर पलटी झालेल्या ट्रकला भरधाव कंटेनर (क्र. GJ 27 TD 1416) जोरदार धडकला. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघातानंतर चालक मोहम्मद नेशी व सहचालक तालीम खान (रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) केबिनमध्ये अडकून पडले. महामार्ग पोलीस, १०३३ रुग्णवाहिका, बचाव पथक तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना प्रथम विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातामुळे काही काळ धुळे–सुरत महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

या बचावकार्यात पोहेका कैलास मोरे, पोना प्रवीण मोरे, पोका श्याम पावरा व पोका जितेंद्र सांगळे आणि 1033 रुग्णवाहिकेच्या कर्मचारी यांनी केबिनमध्ये अडकलेल्या चालक व सहचालकाला सुरक्षित बाहेर काढले.

दरम्यान, कोंडाईबारी घाटात सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे हा घाट वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या मार्गावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना, वेग नियंत्रण व्यवस्था आणि आवश्यक संरक्षक सुविधा उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. घटनास्थळी विसरवाडी पोलिस दाखल झाली होती

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button