Other

भडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पुर. पिकांमध्ये साचले पाणी

भडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पुर. पिकांमध्ये साचले पाणी

भडगावचा शुक्रवार बाजार ठप्प;व्यापारी संकुलांमध्येही शिरले पाणी ,व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

भडगाव प्रतिनिधी

भडगाव शहरासह तालुक्यात राञी वा दि. ३१ रोजी दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पाऊसाने शेती पिकांमध्ये पाणी साचल्याचे दिसुन आले. गिरणा नदी व नाल्यांनाही पुराचे पाणी आलेले होते. उजवा कालवा बांबरुड प्र. ब. गावाजवळ फुटल्याने कालव्याचे पाणी शेती पिकांमध्ये शिरल्याने काही शेतकर्यांचे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकर्यांची मागणी आहे. भडगाव बाजार पेठेतील पारंपरिक शुक्रवारी भरणार्या बाजारावर मुसळधार पावसाने अक्षरशः पाणी फेरल्याचे दिसुन आले. भडगाव तालुक्यात ५१.२१ मि. मि. पाऊस झाल्याची प्रशासनाने नोंद केलेली आहे. शुक्रवारी भरणाऱ्या या आठवडी बाजारासाठी तालुक्यातील लहान-मोठे भाजीपाला व्यापारी पहाटे तीन वाजल्यापासूनच तयारीला लागतात. मात्र सकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण बाजार परिसर जलमय झाला आणि व्यापाऱ्यांचा हिरमोड झाल्याचे चिञ दिसुन आले.

पावसाचा अचूक अंदाज नसल्याने अनेक व्यापाऱ्यांनी पहाटेच भाजीपाला व इतर माल बाजारात आणला होता. दुकानांची मांडणी सुरू असतानाच जोरदार पाऊस कोसळल्याने बाजारात सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना दुकाने उघडताही आली नाहीत.
भडगाव बाजार पेठेच्या चारही बाजूंनी पाणी साचल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक बाजारात पोहोचु शकले नाहीत. परिणामी बाजारपेठेत नेहमीची गर्दी दिसून आली नाही. भाजीपाला विक्रेते तसेच शहरातील व बाजारातील अनेक दुकाने बंद राहिल्याने संपूर्ण शुक्रवार बाजारात शुकशुकाटाचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, काही दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. बसस्टॅंड जवळील बढेसर काॅम्पलेक्स, मेन रोडलगत दत्ताआबा काॅम्पलेक्स आदि व्यापारी संकुलात तसेच न्यायालयासमोरील दुकानांमध्येही कोल्हा नाल्याचे पुराचे पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाल्याचे दिसुन आले.

कोल्हे नाल्याचे पुराचे पाणी आदर्श कन्या विदयालयाच्या आवारात शिरल्याने पाण्याचा तलाव तुंबल्याचे चिञ दिसुन आले. शहरातील कोठली रस्त्यावर , बाळद रस्त्यावर, मेन रोडावर, तसेच बाळद रस्त्यालगत विविध कालनी भागात रस्त्यांवर , घरांजवळ पुराचे पाणी साचल्याने वाहनधारकांसह नागरीकांना शाळेत जाणार्या विदयार्थ्यांना मोठया ञासाचे ठरतांना दिसुन आले. तसेच पाचोरा रस्त्यालगत शिवनेरी प्रवेशद्धाराजवळील भागात, चाळीसगाव रस्त्यालगत भागात घरांजवळ पाण्याचे तलाव साचलेले दिसुन आले. ग्रामिण रुग्णालय परीसरात व शेतकरी सहकारी संघाच्या आवारात तसेच तालुका कृषी कार्यालय परीसरातही पुराचे पाणी वाहत तलावसदृश परीस्थिती दिसुन आली. त्यामुळे कर्मचारी, नागरीकांना याचा ञास सहन करावा लागला. जुना पिंपळगाव रस्त्यावरही पाणी साचल्याने रस्त्यावरची रहदारी विस्कळीत झाल्याचे दिसुन आले.सतत पाऊसधारा सुरु असल्याने शाळा भरण्यावरही याचा परीणाम झाल्याचे दिसुन आले. रस्त्यांवर पुराच्या पाण्याने संपर्क तुटल्याने बस फेर्या वा वाहनधारकांना रहदारीस अडथळा झाल्याचे दिसुन आले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button