शासकीय रुग्णालयांमध्ये तीन रंगात बेडशीट व आधुनिक यांत्रिकी पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेला आरोग्यमंत्र्यांच्याहस्ते राज्यभरात शुभारंभ

जिल्ह्यात महिला बाल रुग्णालय मोहाडी येथून ऑनलाईन उपक्रमात सहभाग
जळगाव – सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यभरातील
जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला बाल रुग्णालय, शासकीय रुग्णालय अंतर्गत जवळपास २९,३१५ खाटांकरिता व ५९३ आरोग्य संस्था आदी ठिकाणी रुग्णांसाठी तीन रंगात बेडशीट व आधुनिक यांत्रिकी पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेला आरोग्य मंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या शुभ हस्ते,आरोग्य राज्य मंत्री ना .मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या खास उपस्थितीत मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने राज्यभरात नुकताच शुभारंभ करण्यात आला.
जळगाव जिल्ह्याकरिता महिला, बाल रुग्णालय मोहाडी येथे पालकमंत्री आदरणीय ना. गुलाबरावजी पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून आरोग्य दूत, रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी,सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य सजन भिला राठोड,विजय माणिक गवळी,यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले .
या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ
सचिन बाहेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आकाश चौधरी,
वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल दासोरे आदीसह सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करणारे तसेच अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी करून राज्यभरात सुरू होणाऱ्या या कार्याची माहिती देऊन सोमवार,शुक्रवार पांढरा रंग,मंगळवार,शुक्रवार हिरवा रंग,बुधवार,शनिवार गुलाबी रंगाच्या चादरी रुग्णासाठी असतील तर
रुग्णांच्या हितासाठी तसेच स्वच्छता असावी याकरिता आधुनिक यांत्रिकी पद्धतीने वस्त्र धुलाई सेवा कार्य सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले.
समयोचित पर आरोग्यदूत मुकुंद गोसावी यांनीही आरोग्य विभागाच्या या अनोख्या अशा रुग्ण हिताच्या कार्यक्रमाचे मन भरून कौतुक केले






