Other

ब्रेकींग : अहमदाबादजवळ २४२ प्रवाशांसह एअर इंडिया विमान कोसळले

महा पोलीस न्यूज । दि.१२ जून २०२५ । गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आज दुपारी एक भीषण विमान अपघात घडला. एअर इंडियाचे अहमदाबाद ते लंडन जाणारे विमान टेकऑफ दरम्यान मेघानी नगर परिसरात कोसळले. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, अशी माहिती गुजरात राज्य पोलिसांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही क्षणांतच ते विमानतळाच्या भिंतीला धडकले, त्यानंतर त्याला आग लागली. हा अपघात मेघानी नगर परिसरातील एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ घडला, जो विमानतळ परिसराला लागून आहे. अपघातानंतर आकाशात काळ्या धुराचे लोट दिसू लागले, आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि बचाव पथके दाखल झाली असून, आग विझवण्याचे आणि प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप प्रवाशांच्या स्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. किती प्रवासी सुरक्षित आहेत किंवा जीवितहानी झाली आहे, याबाबत स्पष्टता नाही.

एअर इंडियाच्या या विमानाचे मागील बाजूस काहीतरी धडकल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक पोलिस आणि विमानतळ प्रशासन या घटनेची चौकशी करत आहे.

या अपघातामुळे अहमदाबाद विमानतळावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुजरातचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेची प्रार्थना केली आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत तपास सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button