Other

जळगाव पोलीस दलाचा गौरव; २६ अधिकारी, अंमलदारांना पोलीस पदके घोषित

दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी अतिउत्कृष्ट, उत्कृष्ट, विशेष आणि पोलीस पदकांनी सन्मान

जळगाव पोलीस दलाचा गौरव; २६ अधिकारी, अंमलदारांना पोलीस पदके घोषित

​दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी अतिउत्कृष्ट, उत्कृष्ट, विशेष आणि पोलीस पदकांनी सन्मान

जळगाव: जळगाव पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी दीर्घकाळ बजावलेल्या उल्लेखनीय, प्रामाणिक व निष्कलंक सेवेची दखल घेत शासनातर्फे १४ ऑगस्ट रोजी एकूण २६ पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच जनसेवेप्रती दाखवलेल्या अखंड निष्ठेसाठी या अधिकारी-अंमलदारांची निवड करण्यात आली असून, या गौरवपूर्ण यशामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले आहे.

​या सन्मानप्राप्त यादीत श्रीकांत धिवरे (उत्कृष्ट सेवा पदक), विजयकुमार ठाकूरवाड (अति उत्कृष्ट सेवा पदक), नितीन गणापुरे (अति उत्कृष्ट सेवा पदक), शशिकांत पाटील (विशेष सेवा पदक), दिनेश वडगुजर (पोलीस पदक), मुजफ्फरअली सय्यद (पोलीस पदक), श्रीकृष्ण पटवर्धन (अति उत्कृष्ट सेवा पदक), सुनील दामोरे (अति उत्कृष्ट सेवा पदक), प्रविणा जाधव (अति उत्कृष्ट सेवा पदक), सुनील माळी (अति उत्कृष्ट सेवा पदक), अनिल इंगळे (अति उत्कृष्ट सेवा पदक), प्रदिप पाटील (अति उत्कृष्ट सेवा पदक), जमीन अहमदखान (अति उत्कृष्ट सेवा पदक), जयंत चौधरी (अति उत्कृष्ट सेवा पदक), हरिष कोळी (उत्कृष्ट सेवा पदक), दिपक पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), संदिप पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), प्रविण वाघ (उत्कृष्ट सेवा पदक), विजय पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), शरद पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), संदिप सावळे (उत्कृष्ट सेवा पदक), महेश महाजन (उत्कृष्ट सेवा पदक), रज्जाकअली सय्यद (उत्कृष्ट सेवा पदक), भाऊसाहेब पाटील (उत्कृष्ट सेवा पदक), अतुल चौधरी (उत्कृष्ट सेवा पदक) आणि ईश्वर पाटील (उत्कृष्ट सेवा पदक) या सर्व २६ अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे. दीर्घकालीन निष्कलंक सेवेला मिळालेली ही पावती संपूर्ण जळगाव पोलीस प्रशासनासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगत पोलीस दलातर्फे सर्व विजेत्यांचे अधिकृत अभिनंदन करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button