Crime

सिमेंटच्या बाकड्याचा वाद : कारच्या धडकेत; पिता ठार, मुलगा गंभीर

कुंभारीतील घटनेने खळबळ; तक्रारीसाठी जात असताना पाठलाग करून धडक दिल्याचा आरोप

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जामनेर तालुक्यातील कुंभारी येथे सिमेंटचे बाकडे ठेवण्यावरून सुरू असलेल्या वादाला गंभीर वळण लागले. तक्रार देण्यासाठी दुचाकीवरून पहूर पोलीस ठाण्याकडे जात असलेल्या पिता-पुत्राच्या दुचाकीला कारने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर उत्तम मोरे (वय ५२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा यश मोरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारी गावात सिमेंटचे बाकडे ठेवण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर मोरे आणि त्यांचा मुलगा यांचा बाळू जोशी, शांताराम जोशी आणि अजय जोशी यांच्यासोबत वाद सुरू होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर पिता-पुत्र तक्रार दाखल करण्यासाठी पहूर पोलीस ठाण्याकडे दुचाकीने निघाले होते.

दरम्यान, त्यांचा पाठलाग करून कारने दुचाकीला धडक देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या धडकेत ज्ञानेश्वर मोरे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यश मोरे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी बाळू उत्तम जोशी याला अटक केली आहे. घटनेतील इतर संशयितांच्या भूमिकेबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर कुंभारी गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. घटनेमागील नेमका वाद आणि कारवाईचे स्वरूप तपासातून स्पष्ट होणार आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button