Politics

कोळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी शीतल महाजन बिनविरोध

कोळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी शीतल महाजन बिनविरोध

भडगाव : प्रतिनिधी कोळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. शीतल कपिल महाजन यांची बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदासाठी सौ. शीतल महाजन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र लोणीया यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी मावळत्या उपसरपंच सौ. ज्योती महाजन यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सौ. शीतल महाजन यांच्याकडे पदाचा पदभार सुपूर्द केला. याप्रसंगी सरपंच सौ. कविता सोनवणे, सौ. ज्योती महाजन, सौ. प्रमिला पाटील, सौ. सुनंदा माळी, सौ. वंदना शिवदास भिल्ल, सौ. सीमा संदेश महाजन, रूपचंद महाजन, रोहिदास पाटील, शुभम ठाकरे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील व विजय केदार सर यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले.

नवनिर्वाचित उपसरपंच सौ. शीतल महाजन यांचे पती कपिल महाजन सर हे किसान शिक्षण संस्थेच्या वडजी येथील विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रताप हरी पाटील तसेच संस्थेच्या सचिव ताईसौ. पूनमताई प्रशांत पाटील यांनी कपिल महाजन सर व सौ. शीतल महाजन यांचे अभिनंदन केले.यावेळी ग्रामपंचायत कोळगाव नम्रता पॅनलचे प्रमुख श्याम पाटील सर, पितांबर पवार, कौतिक सोनवणे, गोविंदराव अमराव महाजन, कपिल महाजन सर, रविंद्र बोरसे सर (बहाळ), डॉ. अनुप पाटील, प्रल्हाद रंगराव पाटील, संदीप हिम्मतराव महाजन, जिभाऊ मालजी पाटील (पिप्रिहाट), गोपाल नाना माळी, दिलीप पाटील सर, सुभाष मोतीराम पाटील, बापू सखाराम पाटील, शिवाजी सोनवणे, आत्माराम ठाकरे, प्रदीप महाजन, भरत पाटील, सुनील पाटील, सुभाष जयराम माळी, देवेंद्र राजेंद्र पाटील, बापू गोविंदा पाटील, एकनाथ अभिमान महाजन, आनंदा महाजन, प्रमोद महाजन, चिंधा फकीरा माळी, राजेंद्र जयराम पाटील, सावता रामदास महाजन, संदेश महाजन सर, गोविंदा तुकाराम माळी, योगेश सैदाणे, हेमंत महाजन, रामदास पाटील, रवींद्र दशरथ माळी, श्याम राजेंद्र माळी, योगेश साहेबराव महाजन, दिनेश पाटील, अंकुश कौतिक सोनवणे, शिवशंकर महाजन, पांडुरंग माळी, अनिल बिऱ्हाडे, भिमराव महाजन, प्रविण महाजन, हेमंत घोडके, गुलाबराव महाजन, संजय जाधव, साहेबराव कोळी, योगेश महाजन, समाधान माळी, रोहित माळी, जितू गोसावी, बापू पवार व दिनेश माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपसरपंचपदी सौ. शीतल महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button