Politics

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष गौरव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष गौरव

विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी,कृषी,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव

जळगाव प्रतिनिधी  प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, शेतकरी, खेळाडू, उद्योजक, वीरपत्नी, शिक्षक, व शासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, व महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते

त्यात पोलीस विभागात गुणवत्तापूर्ण सेवा व 15 वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तुकाराम शिवाजी निंबाळकर यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक प्रदान करण्यात आले.
वन विभागातील मानव व वन्यजीव संघर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वनपाल व वनरक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यात श्री. विपूल पाटील, श्री. अजय महिरे, व श्री. योगेश देशमुख यांचा उल्लेखनीय सहभाग होता. तर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वप्नील कैलास महाजन (आट्यापाट्या), उदय अनिल महाजन (वेटलिफ्टिंग), व रोशनी सलीम खान (आट्यापाट्या) यांना गुणवंत खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. जयंत भालचंद्र जाधव यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला.
उद्योग व कृषी विभागात श्री. चेतन रमेश चौधरी यांनी स्प्रिंग उत्पादनात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले म्हणून गौरविण्यात आले तर श्री. अशोक गडे यांनी केळीपासून बिस्किटे बनविण्याचे बौद्धिक स्वामीत्व हक्क ( पेटेन्ट ) मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला.
सामाजिक कार्यात श्री. नरेंद्र पाटील यांच्या “मानव सेवा तीर्थ” संस्थेला भटकणाऱ्या अनाथ लोकांसाठी केलेल्या कार्याबद्दल गौरविण्यात आले. तर शहीद सैनिक लान्सनायक कै. देविदास त्र्यंबक पाटील यांच्या पत्नी श्रीमती कल्पना देविदास पाटील यांना जमीन वाटपाचा सन्मान करण्यात आले

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button