नगरपरिषद संचलित पी एम. श्री. द. शी. विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नगरपरिषद संचलित पी एम. श्री. द. शी. विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
भुसावळ – नगरपरिषद संचलित पी एम. श्री. द. शी. विद्यालय, भुसावळ येथे भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शालेय परिसर आकर्षक पताका व सुंदर रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण समितीचे चेअरमन राजेंद्र आवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी गटनेते युवराज लोणारी, प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, महिला व बालकल्याण सभापती शोभा इंगळे, मुख्याध्यापक एस. ए. मंदवाडे यांच्यासह शालेय शिक्षण समितीचे सदस्य, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजसंचलनाचे नेतृत्व सी. बी. ढाके यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा पाटील यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समिती चेअरमन जे.टी. मगरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






