जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंडित नेहरू जयंती साजरी

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंडित नेहरू जयंती साजरी
आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयात प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन
जळगाव, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव महानगर शाखेतर्फे भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. आकाशवाणी चौकातील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी आणि महानगर जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्यालयाचे सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान त्यांनी सुमारे नऊ वर्षे तुरुंगवास भोगला. देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून कार्य करताना त्यांनी विज्ञान, शिक्षण, कृषी, औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना दिली. कारखाने, धरणे आणि विविध सरकारी संस्थांच्या उभारणीत त्यांच्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले, असे त्यांनी सांगितले.
नेहरू यांना लहान मुले विशेष प्रिय होती. त्यामुळे मुले त्यांना प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत असत. अशा या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करणे महत्त्वाचे असल्याचे महाजन यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महानगर जिल्हा कार्यालयाचे सरचिटणीस सुनील माळी यांनी आभार मानले.
यावेळी महानगर जिल्हा सरचिटणीस सुहास चौधरी, ओबीसी सेलचे महानगर जिल्हाध्यक्ष गिरीश सांगळे, किरणभाऊ राजपूत, राजुभाऊ बाविस्कर, सतीश चौव्हाण आणि रफीक पटेल उपस्थित होते.







