नशामुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाची जळगाव जिल्ह्यापासून सुरुवात; अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नशामुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाची जळगाव जिल्ह्यापासून सुरुवात; अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गिरीश महाजन यांचे प्रतिपादन; वैशाली फाउंडेशन आणि जिल्हा पोलीस दलाचा संयुक्त उपक्रम
जळगाव, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२९ पर्यंत महाराष्ट्र नशामुक्त करण्याचे ध्येय ठेवले असून, या संकल्पाच्या दिशेने जळगाव जिल्ह्यापासून सुरुवात होत असल्याचा मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.
तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी वैशाली फाउंडेशन आणि जळगाव जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ऑक्टोबर रोजी ‘नशामुक्त जळगाव जिल्हा’ अभियान राबविण्यात आले. महाबळ रोडवरील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाला तरुणाई, पालक, शिक्षक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे सभागृह खचाखच भरले होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत नशामुक्तीचा संकल्प
या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, आमदार नंदकिशोर महाजन, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त योगेश पाटील, सरकारी अभियोक्ता ॲड. सुनील चोरडिया, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, भाजपचे महानगराध्यक्ष तथा नगरसेवक दीपक सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राजेश डी. पाटील, भुसावळच्या माजी नगराध्यक्ष विजय चौधरी आणि निवृत्त आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका उज्वला बेंडाळे, वंदना इंगळे, प्रतीक्षा सोनवणे, जयश्री पाटील आणि शैला चौधरी यांच्यासह माजी नगरसेवक अजय राम जाधव, नगरसेवक नितीन बरडे, अमर जैन, नरेंद्र पाटील, विरेन खडके, अमित काळे, अजित राणे, राहुल वाघ, गणेश सोनवणे, विजय वानखेडे, अनिल अडकमोल, नितीन सपके, चेतन शिरसाळे, सागर शामकांत सोनवणे, गजानन देशमुख, अक्षय वंजारी, निलेश तायडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष महेश पाटील, विजय बांदल, कल्पेश सोनवणे, प्रफुल्ल देवकर, नितीन तायडे, जाकिर पठाण, अतुल बारी आणि किरण भोई आदी सहभागी झाले.
वैशाली फाउंडेशनचा तरुणाईचे भविष्य सुरक्षित करण्याचा संकल्प
वैशाली फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा पोलीस दलाच्या सहकार्याने या अभियानाचे आयोजन करण्यात आले. तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा निर्धार या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.
व्यसनमुक्त तरुणाई म्हणजे सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज आणि उज्ज्वल महाराष्ट्र, हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात आला. नशामुक्ती ही केवळ पोलिसांची किंवा एखाद्या सामाजिक संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक पालक, शिक्षक आणि नागरिकाने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे योगदान
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली फाउंडेशनचे स्वप्निल शेळके, गजानन इंगळे, रोहन सोनवणे, सुनील जंगले, गणेश निंबाळकर, सौरभ पाटील, सागर सोनवणे, विवेक जगदाळे, राहुल जोशी, गौरव वाणी, आशिष पाटील, आदित्य पाटील, ध्रुवेश पाटील, निखिल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
नशामुक्त जळगाव जिल्ह्याच्या माध्यमातून नशामुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाला बळ देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन वैशाली फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली अमित पाटील यांनी केले.







