OtherSocial

पाळधी साईबाबा मंदिराकडे जाणारा मार्ग बंद; भाविक व नागरिकांमध्ये नाराजी

रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पाळधी येथील साईबाबा मंदिराकडे जाणारा महामार्गालगतचा प्रवेशमार्ग बंद करण्यात आल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. संबंधित मार्ग पूर्ववत सुरू करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा भाविक व परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.

पाळधी परिसरातील साईबाबा मंदिर हे जिल्ह्यासह राज्यातील आणि परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दररोज तसेच विशेष धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात गेल्या काही वर्षांत नागरी वस्तीही वाढली असून स्थानिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरला होता.

भाविकांच्या सोयीसाठी महामार्गावरून मंदिराकडे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता उपलब्ध होता. मात्र, अलीकडे हा मार्ग बंद करण्यात आल्याने जळगावकडून येणाऱ्या भाविकांना मंदिरात पोहोचण्यासाठी सुमारे दोन किलोमीटर पुढे जाऊन वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांचा अतिरिक्त वेळ आणि इंधन खर्च वाढत असल्याची तक्रार व्यक्त केली जात आहे.

याच परिसरात प्रसिद्ध गणपती मंदिरही असून तेथे जाणाऱ्या भाविकांनाही आता मोठा फेरा मारून जावे लागत आहे. तसेच स्थानिक रहिवाशांच्या दैनंदिन वाहतुकीवरही याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन मार्ग पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. अन्यथा भाविक आणि स्थानिक रहिवासी एकत्रितपणे तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button