पंडीत प्रदीप मिश्रांनी मानले मंत्री परिवाराचे आभार!
सुनील मंत्री यांचा सपत्नीक सन्मान : ७ दिवस आदित्य लॉन्सची मोफत सेवा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या आदित्य फार्म अँड लॉन्सवर गेल्या ७ दिवसापासून सुरू असलेल्या पंडीत प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या शिवमहापुराण कथेचा समारोप गुरुवारी करण्यात आला. प्रसंगी शिवभक्ती आणि धर्म कार्यासाठी ७ दिवस संपूर्ण लॉन्स परिसर मोफत उपलब्ध करून दिल्याने पंडीत प्रदीप मिश्रा यांनी मंत्री परिवाराचे आभार मानले.
एमआयडीसी परिसरात असलेल्या आदित्य फार्म अँड लॉन्सवर गेल्या ७ दिवसापासून पंडीत प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि शासनाच्या परवानगीने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
गुरुवारी दुपारी शिवमहापुराण कथेचा समारोप करण्यात आला. प्रसंगी पंडीत प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी लॉन्स मालक सुनील मंत्री यांच्यासह परिवाराचे कौतुक करत आभार मानले. ते म्हणाले की, लोक एक दिवसासाठी खोली देत नाही. मंत्री परिवाराने संपूर्ण ७ दिवस संपूर्ण परिसर मोफत उपलब्ध करून दिला. एकही रुपया न घेता त्यांनी ते उपलब्ध करून दिले. मनुष्य धनाने नव्हे मनाने श्रीमंत असावा. मंत्री परिवाराने मनाच्या मोठेपणा दाखवला. मनुष्य मनाने मोठा होतो तेव्हा जीवनाची सार्थकता आपसूकच सिद्ध होते.
मंत्री दांपत्याचा सन्मान
शिवमहापुराण कथेसाठी लॉन्स परिसर मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल पंडीत प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी सुनील मंत्री यांना व्यासपीठावर आमंत्रित करून सपत्नीक सन्मान केला. हजारो शिवभक्त भाविकांची पाऊले या परिसरात पडल्याने परिसर धन्य झाल्याचे ते म्हणाले.
पहा संपूर्ण व्हिडिओ :
https://www.instagram.com/reel/DPmD1vugori/?igsh=cmc5NXQxbHEzMnVq






