भाजप ऑटो स्कूल व्हॅन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा प्रमोद अण्णा वाणी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्ह्याच्या ऑटो स्कूल व्हॅन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा प्रमोद अण्णा वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि आमदार राजुमामा भोळे यांनी प्रमोद वाणी यांना हे नियुक्ती पत्र दिले आहे.
प्रमोद वाणी यांनी आतापर्यंत पक्षासाठी सक्रिय कार्यकर्ता म्हणून जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, आता पक्षाने त्यांना दिलेल्या संघनात्मक कामाची पावती म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे. पक्ष बळकट करण्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील योजना व शासनाच्या कार्याला गती देण्यासाठी दुप्पट जोमाने काम करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नव्या जबाबदारीबद्दल जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी प्रमोद अण्णा वाणी यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसंगी महानगर सरचिटणीस नितीन इंगळे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, मुकुंद मेटकर, शहराध्यक्ष उज्वला बेंडाळे, शहराध्यक्ष नीतू परदेशी, प्रल्हाद सोनवणे, नारायण पाटील, सुनील जाधव, विजय अहिरराव तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.






