Crime

धुळ्यात कॅफांमध्ये २२ महाविदयालयीन तरुण, तरुणी अश्लील चाळे करतांना आढळले !

धुळ्यात कॅफांमध्ये २२ महाविदयालयीन तरुण, तरुणी अशील चाळे करतांना आढळले !

अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

धुळे प्रतिनिधी  शहरातील देवपूर भागात एका कॅफेमध्ये २२ महाविद्यालयालयीन तरुण तरुणी अश्लील चाले करताना आढळून आल्याने देवपूर पोलिसांनी धाड त्या तरुण तरुनींना ताब्यात घेऊन पालकांना बोलावून समज देऊन सोडण्यात आले. कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरात देवपुर भागातील शाळा, महाविदयालय परिसरात असलेल्या कॅफे मध्ये महाविदयालयातील तरुण, तरुणी हे अश्लील चाळे करत असतात याबाबत पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या माहितीवरुन त्याचे सुचनावरुन देवपुर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक धनंजय व्ही पाटील यांनी पाच पथक तयार करून सदर पथकाने देवपुर भागातील एकुण १० कॅफेवर छापा टाकुन तपासणी केली असता त्यापैकी डी. लाईट कॅफे, शाईनिंग कॅफे, रॉयल लॉज, विथ यु कॅफे, शुगर कॅफे, एकुण ०५ कॅफे मध्ये एकुण २२ महाविदयालयीन तरुण, तरुणी हे कॅफेच्या आतमध्ये तयार करण्यात आलेल्या कॅबीनमध्ये अश्लील चाळे करतांना रंगेहात मिळुन आल्याने सर्व विदयार्थ्यांना तसेच कॅफे चालक, मालक यांना देवपुर पोलीस स्टेशनला येथे आणुन तरुण, तरुणी यांचे पालकांना बोलावुन त्यांना समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच कॅफे मालक यांचेविरुध्द कायदेशिर कारवाई करणेत येत आहे. तसेच सदर कॅफे चे आत मध्ये अनधिकृत पणे तयार करण्यात आलेले कंर्पाटमेन्ट हे महानगर पालीका याचे अतिक्रमण पथका कडुन तोडुन टाकण्यात आले आहे. सदरची कामगीरी ही श्रीकांत धिवरे सो पोलीस अधीक्षक धुळे, किशोर काळे सोो अपर पोलीस अधिक्षक धुळे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे सो धुळे शहर विभाग धुळे यांचे मार्गदर्शना खाली देवपुर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी धंनजय व्ही पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्रीराम पवार व त्याचे पथक तसेच जिल्हा विशेष शाखेचे पोउपनि निकीता महाले त्याचे पथक देवपुर पोलीस ठाणेकडील सपोनि बी. बी. पाटील, पोउपनि साईनाथ तळेकर, असई मिलिंद सोनवणे, असई वैसाणे, पोहेकों विसपुते, पोहेकों योगेश सोनार, पोहेकों विजय जाधव, पोहेकों महेंद भदाणे, पोहेकों के.टी पाटील, पोकों मधुकर पाटील, पोकों अशोक चव्हाण, पोकों नितीन चव्हाण, पोकों वसंत कोकणी, पोकों प्रकाश थोरात, पोकों राहुल गुंजाळ, पोकों सौरभ कुटे, पोकों प्रविण पाटील, मपोहेका चारुशिला शिरसाठ, पोकों तब्बसुम धोबी, पोकों आरती दिवेकर, चापोहेकों योगेश महाजन, चापोकों मनोहर भामरे यानी सदरची कारवाई केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button