Other

एसटी महामंडळाच्या आर. के. पाटील यांचा सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव

एसटी महामंडळाच्या आर. के. पाटील यांचा सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव

जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्थापत्य शाखेतील लिपिक तथा महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र राज्य मुंबईचे राज्य उपाध्यक्ष आर. के. पाटील यांच्या ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनिमित्त सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा २६ जून २०२६ रोजी संतबाबा हरदासराम समाज कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे आशिया खंडातील अग्रगण्य महामंडळ असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. सर्व जाती-धर्म आणि समाजातील प्रत्येक घटकाला सेवा देण्याचे कार्य एसटी कर्मचारी करत असून, एसटी ही केवळ महाराष्ट्राची जीवनवाहिनी नसून रक्तवाहिनी आहे, असे त्यांनी नमूद केले.

“गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात एसटी महामंडळाचा सिंहाचा वाटा असल्याचे अधोरेखित केले. आर. के. पाटील यांनी ३७ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत कर्मचारी हितासाठीही उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या योगदानाचे कौतुक त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आर. के. पाटील व त्यांच्या पत्नीचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, माजी परिवहन मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर, चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा), महापौर दीपमाला काळे, पाचोराचे आमदार किशोर पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, माजी उपमहाव्यवस्थापक सोपानराव नाबदे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचे माजी स्वीय सहाय्यक माधव देवधर, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे उपाध्यक्ष किरण बिडवे, संघटक सचिव सुभाष जाधव, सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे गुलाब शेख, सुरेश चांगरे, गोपाल पाटील, विनोद शितोळे, प्रशांत मोरे, सागर निकुंभ, खुशाल मोरे, शैलेश नन्नवरे तसेच एसटी महामंडळ जळगाव विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर. के. पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आजी-माजी कर्मचारी, सहकारी आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण निरोप दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी. बी. महाजन यांनी केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button