कष्टकरी कामगारांसाठी आरोग्य शिबिर; ५०० कामगारांची तपासणी

कष्टकरी कामगारांसाठी आरोग्य शिबिर; ५०० कामगारांची तपासणी
मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान; राजूमामा भोळे यांच्या हस्ते उद्घाटन, मोफत औषधोपचार
जळगाव, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री सहायता कक्ष, महाराष्ट्र राज्य आणि भाजपा जळगाव महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील कष्टकरी कामगारांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या शिबिरात सुमारे ५०० कामगारांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कामगारांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वठार, बाजार समितीचे संचालक अशोक राठी, दीपक परदेशी, डॉ. अरुण पाटील, मिलिंद चौधरी, योगराज सपकाळे, इंद्रराज सपकाळे, समाधान धनगर, संतोष इंगळे, विजय वानखेडे, कौमेश सपकाळे, राजू मराठे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विविध आजारांची तपासणी; औषधोपचार मोफत
शिबिरात हृदयरोग, स्त्रीरोग, जनरल मेडिसिन, दंतविकार, नेत्रविकार, नाक-कान-घसा आणि मूत्ररोगविषयक तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय रक्ततपासणी करून गरजेनुसार मोफत औषधोपचार व औषधांचे वाटप करण्यात आले. कष्टकरी कामगारांना एकाच ठिकाणी विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला.
या शिबिरासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष, महाराष्ट्र राज्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, शासकीय दंत महाविद्यालय जळगाव आणि महादेव हॉस्पिटल जळगाव यांचे सहकार्य लाभले.
आयोजकांसह स्वयंसेवकांचे परिश्रम
शिबिराचे संयोजक पितांबर भावसार यांनी सूत्रसंचालन केले, तर व्यापारी आघाडीचे अशोक राठी यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विनय बाहेती, संतोष पवार, विष्णुकांत मणियार, मनोज नागला, सुनील तापडिया, दीपक महाजन, मुकेश कुकरेजा, व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, हमाल-मापाडी संघटनेचे पदाधिकारी आणि जी.एम. फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.







