PoliticsSocial

१५४ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचे दर्शन; मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिताताई वाघ यांच्यासह भाविकांची ओढला रथ..!

महापौर दीपमाला काळे, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्या निवासस्थानी 'श्री सरस्वती वहनाचे' भक्तीमय स्वागत

१५४ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचे दर्शन; मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिताताई वाघ यांच्यासह भाविकांची ओढला रथ..!

महापौर दीपमाला काळे, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्या निवासस्थानी ‘श्री सरस्वती वहनाचे’ भक्तीमय स्वागत

जळगाव : जलग्रामोत्सव अर्थात श्रीराम मंदिर संस्थानच्या १५४ वर्षांच्या प्राचीन व ऐतिहासिक परंपरेचा वारसा सांगणाऱ्या श्रीराम रथोत्सवातील ‘श्री सरस्वती वहन’ सोहळा शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर, कार्तिक शुक्ल पंचमी) अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे व नगरसेविका ॲड. शुचिता अतुलसिंह हाडा यांच्या रामदास कॉलनी येथील निवासस्थानी रात्री ८.५० वाजता या पवित्र वहनाचे आगमन झाले.

या प्रसंगी आयोजित पानसुपारी कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, औद्योगिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत प्रभू श्रीरामचंद्र व श्री सरस्वती मातेचे दर्शन घेतले.

*मंत्रोच्चार आणि टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत*
रथयात्रेदरम्यान वहन निवासस्थानी दाखल होताच श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी आणि ब्रह्मवृंदांचे अत्यंत पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. वेदघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि “जय श्रीराम”च्या जयघोषाने संपूर्ण रामदास कॉलनी परिसर दुमदुमून गेला होता. महापौर दीपमाला काळे व नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी सहकुटुंब वहनाची विधिवत पूजा व महाआरती केली.

*मान्यवरांची मांदियाळी आणि स्नेहमीलन*
या ऐतिहासिक आणि पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे नेते ना. गिरीश महाजन, खा. स्मिताताई वाघ, उप महापौर मनोज चौधरी, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी श्री सरस्वती वहन व प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेऊन जळगावकरांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे विविध नगरसेवक, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

उपस्थित सर्व भाविक आणि मान्यवरांचे पानसुपारी देऊन स्वागत करण्यात आले. भक्ती, परंपरा आणि आपुलकीचा संगम असलेल्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button