Social

वडजी येथे राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न !

वडजी येथे राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न !

भडगाव (प्रतिनिधी ) राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचे औचित्य साधून वडजी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणान्या तसेच उत्कृष्ट कार्य करणान्या पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. समाजातील घडामोडी, जनतेच्या समस्या आणि विकासांचे प्रश्न आपल्या लेखणीतून मांडत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणान्या पत्रकारांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला भडगाव ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका मनीषा दीदी तसेच वडजी केंद्राच्या संचालिका चेतना दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांचे विद्यार्थी व सेवाभावी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी रविंद्र पाटील, भूषण पाटील, किसन पाटील, सुरेश वाघ, एकनाथ नेरपगार, संजय नेरपगार, पांडुरंग पाटील, गुलाब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सोमनाथ शिंपी, छोटू पाटील, भीमसिंग राजपूत, चेतन पाटील यांच्यासह भडगाव तालुक्यातील अनेक पत्रकार बांधवांनी सहभान नोंदविला.

पत्रकारिता हे केबळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजाला योग्य दिशा देण्याचे, सत्य जनतेसमोर आणण्याचे आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचे प्रभावी कार्य आहे. पत्रकारांच्या निःपक्षपाती लेखणीतून समाजातील सकाराामक बदलांना चालना मिळते, अशा भावनेतून पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी या सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते.ब्रह्माकुमारी परिवाराच्या या उपक्रमामुळे पत्रकार बांधवांमध्ये आनंदांचे वातावरण निर्माण झाले. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करणान्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल उपस्थित पत्रकारांनी आयोजकांचे आभार मानले.पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणारा हा उपक्रम वडजी परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button